Manasvi Choudhary
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे.
तुम्ही देखील काही या ५ टिप्सच्या उपयोगाने पेट्रोल आणि डिझेलची बचत करू शकता.
वाहन चालवताना स्पीड वाढवणे आणि अचनाक ब्रेक मारल्याने इंधन जास्त खर्च होतो. वाहनाचा वेग सामान्य ठेवल्याने इंधनाची बचत होण्यास मदत होते.
ट्रॅफिक सिग्नलला ३० सेकंदापेक्षा अधिक वेळ थांबायचे असल्यास तुम्ही वाहनाचे इंजिन बंद करणे महत्वाचे आहे.
वाहन सुरून ठेवून कोणाची वाट पाहात असाल तर तुमचे इंधन जास्त खर्च होते हे लक्षात घ्या.
वाहनाची वेगमर्यादा निश्चित ठेवा. अधिक फास्ट आणि नंतर मंदगतीने वाहन चालवल्याने इंधन जास्त खर्च होते.
कारमधील एसीमुळे इंधनाचा वापर वेगाने वाढतो गरज असेल तेव्हाच एसी सुरू ठेवा.
वाहनाची सर्व्हिसिंग वेळेत करा यामुळे इंधनाची बचत होण्यास मदत होईल. वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने वाहनाचे मायलेज कमी होते.