Shruti Vilas Kadam
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. हे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि उकाड्यात थंडावा मिळवून देते.
खरबूज शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतं. यामध्ये जीवनसत्त्वे आणि मिनरल्सही भरपूर प्रमाणात असतात.
काकडीमध्ये पाणी आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीर थंड राहण्यास आणि पचन सुधारण्यास मदत मिळते.
नारळपाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतं. त्यातील मलईही शरीराला ऊर्जा आणि थंडावा देते.
व्हिटॅमिन C ने समृद्ध असलेली ही फळे शरीराला ताजेतवाने ठेवतात आणि उष्णतेमुळे होणारा थकवा कमी करण्यास मदत करतात.
द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.
पपई पचनासाठी फायदेशीर असून शरीर हलकं ठेवण्यास मदत करते. उकाड्यात पोटाशी संबंधित त्रास कमी करण्यासाठीही हे फळ उपयुक्त ठरू शकतं.