Shruti Vilas Kadam
एका वाटीत २ टेबलस्पून कस्टर्ड पावडर थोड्या थंड दुधात नीट मिसळून घ्या, गुठळ्या राहू देऊ नका.
कढईत किंवा भांड्यात २ कप दूध उकळायला ठेवा. दूध उकळल्यावर त्यात साखर घालून नीट ढवळा.
उकळत्या दुधात तयार केलेली कस्टर्ड पावडर हळूहळू घालत सतत ढवळा. मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा.
गॅस बंद करून कस्टर्ड पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम कस्टर्डमध्ये फळे घातल्यास ती पाणी सोडतात.
सफरचंद, केळी, द्राक्षे, डाळिंब, पपई किंवा आंबा यासारखी आवडती फळे छोटे तुकडे करून ठेवा.
कस्टर्ड पूर्ण थंड झाल्यावर त्यात कापलेली फळे हळूवार मिसळा. हवं असल्यास थोडी ड्रायफ्रूट्स घालू शकता.
फ्रूट कस्टर्ड फ्रिजमध्ये थोडा वेळ थंड करून सर्व्ह करा. चव वाढवण्यासाठी वरून काजू, बदाम किंवा चेरीने सजवा.
(टिप- केळी शेवटी घाला, नाहीतर रंग बदलू शकतो.)