Shreya Maskar
नवीन वर्षाची सुरुवात फ्रुट कस्टर्ड खाऊन करा.
फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी कस्टर्ड पावडर, दूध, साखर आणि तुमच्या आवडीची फळे इत्यादी साहित्य लागते.
फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात साखर घालून छान मिक्स करा.
दुसरीकडे पॅनमध्ये दूध व्यवस्थित उकळून घ्या.
आता या दुधात कस्टर्ड पावडर आणि साखरचे मिश्रण घाला.
१० ते १५ मिनिटे मिश्रण उकळून थंड करून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात आपल्या आवडत्या फळांचे काप टाका.
आता हे फ्रूट कस्टर्ड थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये १ ते २ तासांसाठी ठेवून द्या.