Manasvi Choudhary
महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीत डोंगररांगांमध्ये येथे अनेक पर्यटक आणि ट्रेकर्स भेट देतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे किल्ले ट्रेकर्ससाठी जणू स्वर्गच आहेत. जर तुम्हाला देखील महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या ९ किल्ल्यांना भेट देऊ शकता.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा जवळ, सह्याद्रीच्या रांगेत उंच डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्यावरील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे खडकात नैसर्गिकरीत्या तयार झालेले 'छिद्र' ज्याला 'निडल होल' म्हणतात.
हिंदवी स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीस्थळ म्हणजे रायगड किल्ला. रायगड किल्ल्यावर तुम्हाला ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता.
पनवेल जवळील प्रबळगडाच्या शेजारी कलावंतीण दुर्ग हा किल्ला आहे. गडाच्या शिखराकडे जाणाऱ्या अरुंद, नागमोडी पायऱ्यांमुळे हा किल्ला धोकादायक ठरला आहे.
राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानीचा किल्ला होता आणि जवळपास २५ वर्षे तो राजधानी म्हणून वापरला गेला. किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १,३७६ मीटर उंच आहे आणि त्याची रचना त्रिकोणी स्वरूपात आहे.
लोणावळा आणि कर्जतच्या मधोमध असलेला राजमाची किल्ला हा ट्रेकर्ससाठी प्रसिद्ध आहे.
अर्धचंद्राकृती पसरलेला हरिशचंद्र किल्ला अहमदनगर जिल्ह्यात आहे. . येथील 'कोकणकडा' हे या ट्रेकचे सर्वात मोठे आकर्षण आहे.