Kidney Disease: तुमची किडनी खराब होतेय का? 'हे' 6 संकेत युरिनमध्ये नाही, डोळ्यांमध्ये दिसतात

Surabhi Jayashree Jagdish

लक्षणं

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, किडनी खराब होण्याची काही सुरुवातीची लक्षणं लघवीत नाही तर थेट डोळ्यांमध्येही दिसू शकतात. ही लक्षणं कोणती आहेत ते आपण पाहूयात.

Kidney Symptoms | saam tv

डोळ्यांच्या आसपास सतत सूज येणं

किडनी नीट कार्य करत नसल्यास लघवीतून आवश्यक प्रोटीन बाहेर पडू लागतात. त्यामुळे शरीरातील ऊतींमध्ये द्रव साचतो आणि डोळ्यांच्या खाली किंवा आसपास सूज दिसू लागते. सकाळी उठल्यानंतर थोडी सूज सामान्य असली तरी ती दिवसभर कायम राहणे किंवा वारंवार दिसणे हे किडनीच्या आजाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

Puffy Eyes | saam tv

डोळे कोरडे पडणं

किडनीचं कार्य बिघडल्यास शरीरातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजांचं संतुलन बिघडू शकतं. याचा परिणाम डोळ्यांतील नैसर्गिक ओलाव्यावर होऊन डोळे कोरडे पडणं, जळजळ होणं आणि खाज येणं अशी लक्षणं दिसू शकतात.

Dry Eyes | saam tv

डोळे सतत लाल दिसणं

किडनी नीट कार्य करत नसल्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेत बदल होतात. कॅल्शियम आणि फॉस्फेटचे सूक्ष्म स्फटिक डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर साचल्यामुळे डोळे लाल दिसू शकतात. अनेकजण हे केवळ अॅलर्जी किंवा थकव्याचं लक्षण समजून दुर्लक्ष करतात, पण काही वेळा ते किडनीच्या समस्येचं संकेत असू शकतं.

Blurred Vision | saam tv

धूसर दिसणं

मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही किडनी खराब होण्याची प्रमुख कारणं असून त्यांचा परिणाम डोळ्यांच्या रेटिनावरही होतो. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात अतिरिक्त द्रव साचून डोळ्याच्या लेन्सच्या आकारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दृष्टी धूसर होणं किंवा वस्तू स्पष्ट न दिसणं अशी समस्या निर्माण होऊ शकते.

Eye Pain | saam tv

बाजूची दृष्टी कमी होणं

किडनीच्या आजारामुळे वाढलेला रक्तदाब डोळ्यांतील रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण निर्माण करू शकतो. त्यामुळे हळूहळू बाजूच्या दिशेने दिसण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि काही प्रकरणांमध्ये ग्लॉकोमासारख्या स्थितीचा धोका वाढू शकतो.

Chronic Kidney Disease | saam tv

डोळ्यांत वेदना जाणवणं

किडनी अतिरिक्त द्रव योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नसल्यास शरीरात द्रव साचण्याचं प्रमाण वाढतं. या अतिरिक्त द्रवामुळे डोळ्यांच्या आतील दाब वाढू शकतो, ज्यामुळे डोळ्यांत जडपणा, दाब किंवा सौम्य वेदना जाणवू शकतात. अशी लक्षणं सतत जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

High Blood Pressure | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kidney Health | saam tv

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Milk | saam tv
येथे क्लिक करा