Mahabharata curses: महाभारतातील असे ७ शाप ज्यामुळे संपूर्ण युद्धाची दिशा बदलली होती, जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

परशुरामांचा कर्णाला शाप

कर्णाने ब्राह्मण असल्याचं खोटं सांगून भगवान परशुराम यांच्याकडून दिव्य अस्त्रविद्या शिकली होती. सत्य समजल्यानंतर परशुरामांनी कर्णाला शाप दिला की, ज्या क्षणी त्याला या विद्येची सर्वाधिक गरज असेल, त्याच वेळी तो ब्रह्मास्त्रासह दिव्य अस्त्रांचं मंत्र विसरेल. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाशी अंतिम द्वंद्व सुरू असताना हा शाप खरा ठरला आणि त्यामुळे कर्णाचा पराभव झाला.

Mahabharata curses | saam tv

ब्राह्मणाचा कर्णाला शाप

एकदा कर्णाच्या बाणामुळे चुकून एका ब्राह्मणाची गाय मृत्यूमुखी पडली. संतप्त ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला की, युद्धातील निर्णायक क्षणी त्याच्या रथाचं चाक जमिनीत रुतून बसेल आणि तो असहाय्य अवस्थेत शत्रूच्या हातून मारला जाईल. अर्जुनाशी युद्ध करताना कर्णाच्या रथाचं चाक खरोखरच जमिनीत अडकलं आणि त्याच अवस्थेत अर्जुनाने त्याचा वध केला.

Karna curse | saam tv

पृथ्वीदेवीचा कर्णाला शाप

काही कथांनुसार कर्णाने पृथ्वीचा अनादर केला त्यामुळे पृथ्वीदेवी त्याच्यावर संतापल्या. त्यांनी शाप दिला की, युद्धाच्या निर्णायक क्षणी पृथ्वी त्याच्या रथाचं चाक गिळून टाकेल. त्यामुळे कर्णाला रथाचं चाक बाहेर काढण्यात वेळ गेला आणि अर्जुनाला त्याचा वध करण्याची संधी मिळाली.

Karna and Parashurama | saam tv

उर्वशीचा अर्जुनाला शाप

स्वर्गात उर्वशीने अर्जुनावर प्रेम व्यक्त केलं परंतु अर्जुनाने तिला मातेसमान मानून तिचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे संतप्त उर्वशीने अर्जुनाला काही काळ नपुंसक होण्याचा शाप दिला. नंतर अज्ञातवासाच्या काळात हाच शाप अर्जुनासाठी वरदान ठरला.

Earth Goddess curse | saam tv

ऋषी किंदमांचा पांडूला शाप

राजा पांडूने शिकारीदरम्यान हरिण समजून एका ऋषी आणि त्यांच्या पत्नीवर बाण सोडला. ते ऋषी किंदम आणि त्यांची पत्नी हरिणाच्या रूपात होते. मरण्यापूर्वी ऋषी किंडमांनी पांडूला शाप दिला की, पत्नीशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करताच त्याचा मृत्यू होईल.

Pandu curse | saam tv

मांडव्य ऋषींचा यमधर्माला शाप

मांडव्य ऋषींना अन्यायाने कठोर शिक्षा झाली तेव्हा त्यांनी यमधर्माला विचारलं की, अशी शिक्षा का मिळाली. यमाने बालपणीच्या एका छोट्या चुकीचं कारण सांगितल्यावर ऋषींनी त्याला शाप दिला की, मानवजन्म घ्यावा लागेल. या शापामुळे यमधर्माने विदुर म्हणून जन्म घेतला आणि विदुरांनी सतत धर्माचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला.

Kindama Rishi | saam tv

गांधारींचा श्रीकृष्णाला शाप

महायुद्धानंतर आपल्या शंभर पुत्रांचा मृत्यू पाहून गांधारी अतिशय दुःखी झाल्या. त्यांनी श्रीकृष्णाला शाप दिला की, जसा कौरव वंश नष्ट झाला तसाच यादव वंशही परस्परांतील संघर्षामुळे नष्ट होईल आणि श्रीकृष्णांचाही देहत्याग एकाकी अवस्थेत होईल.

Mandavya Rishi | saam tv

टीप

वरील माहितीचं वर्णन व्यासकृत महाभारतात केलेलं आहे. पृथ्वीदेवीचा कर्णाला दिलेला शाप हा मात्र प्रामुख्याने लोकपरंपरा आणि काही प्रादेशिक आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

Vidura | saam tv

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

Dharma | saam tv
येथे क्लिक करा