ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज फ्रेंडशीप डे म्हणजेच मैत्री साजरा करण्याचा आणि मैत्रीचे अतूट नाते आणखी घट्ट बनवण्याचा दिवस आहे.
प्रत्येकाच्या जीवनात एक अशी व्यक्ती असतेच जी सुखातच नाही तर दुखातही सावली प्रमाणे आपल्या सोबत असते. ज्याला आपण बेस्टफ्रेंड म्हणतो.
आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने तुमच्या आवडत्या बॉलीवूड कलाकाराच्या जीवनातील बेस्टफ्रेंड्स कोण आहेत जाणून घेऊया.
शाहरूख खान आणि काजोलची मैत्री "एक मुलगा आणि मुलगी कधीच चांगले मित्र होऊ शकत नाहीत" या विधआनाला खोटं ठरवते. कुछ कुछ होता है, कभी खुशी खभी गम अशा अनेक ब्लॉकबास्टर चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केलं आहे.
रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी हे दोघं अगदी लहानपणीचे मित्र आहेत. अयानच्या अनेक चित्रपटात रणबीरचा चेहरा दिसतो. या दोघांच्या मैत्रीप्रमाणे कौटुंबिक संबंधही खुप चांगले आहेत.
करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी सुद्धा खुप चांगल्या मैत्रीणी आहेत. करीना नेहमी तिच्या बोलण्यात बेस्टफ्रेंड म्हणून अमृताचा उल्लेख करत असते.
रणबीर आणि अयान प्रमाणे वरूण धवन आणि श्रद्धा कपूर देखील लहानपणीचे मित्र आहेत. गंमत म्हणजे लहानपणी वरूणला श्रद्धावर क्रश आला होता. हे दोघेही अनेकवेळा त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना दिसतात.
आलिया भट्टची बेस्टफ्रेंड आकांशा रंजन आहे. दोन मुलींच्या मैत्रीत बहीणींसारखे नाते असते याचं एक सुंदर उदाहरण आहे.
अक्षय कुमार आणि रितेश देसमुखने बऱ्याच चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहे. या दोघांची मैत्री देखील चांगल्या मैत्रीच्या यादीत येते.