Shreya Maskar
'फ्रेंडशिप डे' ला मिळालेल्या चॉकलेटांपासून झटपट चॉकलेट ब्राउनी बनवा.
चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी डार्क चॉकलेट, मैदा, दूध, बटर, साखर, कॅडबरी, मीठ इत्यादी साहित्य लागते.
एका भांड्यात डार्क चॉकलेट आणि आपली कोणतीही चॉकलेट कॅडबरी टाकून मायक्रोवेव्ह करा.
एका भांड्यात मैदा, साखर, मीठ एकत्र करून घ्या.
आता या मिश्रणात दूध आणि चॉकलेटचे मिश्रण घालून चांगले फेटून घ्या.
बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर लावून त्यावर तयार केलेले पीठ पसरवा.
३ ते ४ मिनिटे हे मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा.
ब्राउनी बेक झाल्यावर प्लेटवर काढून त्यावर चॉकलेट सॉस घाला.
अशाप्रकारे टेस्टी चॉकलेट ब्राउनी तयार झाली.
चॉकलेट ब्राउनीची चव वाढवण्यासाठी त्यात आईस्क्रीम टाकून शकता.