Shreya Maskar
पावसाळ्यात भोपळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. भोपळा आरोग्यासाठी उत्तम असतो.
पावसात गोड, चटपटीत मुलांच्या खाऊसाठी भोपळ्याचे घारगे बनवा.
भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी भोपळा, गूळ, तेल , मीठ , गव्हाचे पीठ , तांदळाचे पीठ, खसखस इत्यादी साहित्य लागते.
भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी सर्वप्रथम भोपळ्याची सालं काढून छोटे तुकडे करून घ्या.
भोपळ्याच्या तुकड्यात गूळ घालून हे कुकरमध्ये उकडून घ्या.
कुकर थंड झाल्यावर भोपळ्याचे तुकडे आणि गूळ मॅश करून घ्यावे.
आता एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, खसखस, चवीनुसार मीठ तसेच भोपळा-गुळाचे सारण टाकून कणीक मळून घ्या.
आता कणकेचे गोळे करून पुरीसारखे लाटून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात घारगे खरपूस तळून घ्या.
अशाप्रकारे गोड, स्वादिष्ट भोपळ्याचे घारगे तयार झाले.लोणच्यासोबत याचा आस्वाद घ्या.