Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

पैशाची आवका जावक म्हणण्यापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तब्येतीच्या तक्रारी, वाहनांपासून सावधगिरी बाळगावी लागेल.

Mesh | saam tv

वृषभ

वैवाहिक जीवन खूप छान असेल.सुसंवाद साधला जाईल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. कोर्टाच्या कामात सुद्धा यश मिळेल. दिवस चांगला आहे.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. मात्र त्याचबरोबर आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची काळजी घ्यावी.

Mithun | saam tv

कर्क

कामाच्या ठिकाणी अंदाज अचूक ठरतील. प्रवासाचे योग आहेत . उपासनेच्या मार्गांमधून पुढे जाल. शिव उपासना करावी.

kark | saam tv

सिंह

राहत्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. मन प्रसन्न आणि शांत वाटेल. कुटुंबीयांच्या सहकार्याने चांगल्या काही घटना घडतील.

सिंह | Saam Tv

कन्या

एकूणच तुमच्या कर्तुत्वाला चांगला आयाम मिळणार आहे. जिद्द आणि चिकाटीने पुढे जाणार आहात. सहज सोप्या गोष्टी घडताना काही जबाबदाऱ्याही अंगावर येतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

जुनी उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्याला दिवस चांगला आहे. धनलाभ होतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

तूळ | saam tv

वृश्चिक

दैनंदिन कामामध्ये चांगल्या प्रकारे गती येईल. अडकलेली कामे मार्गी लागतील. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर आज कमी होण्याच्या संभव आहे.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

महत्वाची कामे शक्यतो उद्याच केलेली बरे. कारण ती रखडण्याची शक्यता आहे. विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणी बघून मनोबल कमी राहील. काळजी घ्यावी.

Dhanu Rashi | Yandex

मकर

अनेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि कामे मार्गी लागतील. धन लाभाला दिवस चांगला आहे.

मकर | Saam Tv

कुंभ

मनोबल आणि आत्मविश्वास यांत वाढ होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव होईल. समाजकारण राजकारणामध्ये घोडदौड होईल.

कुंभ | Saam Tv

मीन

हाती घेतलेले काम नेटाने होईल. कामांमध्ये सुयश मिळेल. मानसिक स्वास्थ आणि समाधान यांनी भरलेला आजचा दिवस आहे. सदगुरु भेटतील.

Meen | Saam Tv

NEXT: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

Vastu tips | google
येथे क्लिक करा