Sakshi Sunil Jadhav
"चलती का नाम गाडी" असा काहीसा दिवस आहे. व्यस्तता वाढती राहील. नवनवीन संकल्पना व्यवसायाच्या बाबतीत येतील.
सोसाटच्या वाऱ्यामध्ये जशी पानगळ होते तशा काही इच्छा गोष्टी आज तुमच्या आयुष्यात होणार आहेत.
सोनसळी असा दिवस आहे. सुवर्ता यांची बरसात होईल. आपण केलेले कर्म आपल्याबरोबर येते हे आज खास करून जाणवेल.
आपल्या राशीला असणारा भावनिक आणि प्रेमळ स्वभाव आज कामाच्या ठिकाणी सुद्धा सर्वांना घेऊन जाईल.
शक्य असेल तितकी उपासना आज करा. धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग होईल. तीर्थयात्री भेटी होतील.
नको असलेल्या ठिकाणी हिशोब करणे आणि हव्या असणाऱ्या ठिकाणी बेहिशोबी राहणे आज करू नका.
जे असेल ते स्वीकारून आज पुढे जावं लागेल. कामांमध्ये यश मिळेल. पण इतरांच्या सल्ल्याने किंवा मताने कामे केल्यास बरे राहील.
सातत्याने परिस्थितीशी झुंज देणे आता आपल्याला अवघड जाते आहे. आज मात्र दिवस संमिश्र आहे.
आपली संतती हीच आपल्यासाठी संपत्ती आहे हे आपण जाणून आहात. त्यांच्या यशासाठी, प्रगतीसाठी विशेष मेहनत घ्या. धनयोग चांगले आहेत.
जुन्याचे नवे करण्याचा आजचा दिवस आहे. मग घर असो, आजूबाजूचा परिसर किंवा नाती.
व्यवसायामध्ये भाग्योदय कारक घटना आज घडणार आहेत. भावंडांच्या सौख्यमुळे पुढे जाल. काळजी घ्या.
आपल्यामध्ये रुजलेले संस्कार कुटुंबीयांना विशेष भावतात. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आज कुटुंबामध्ये तुम्हाला पेलाव्या लागतील.