Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

Surabhi Jayashree Jagdish

वारंवार लघवी होणं

काही लोकांना सतत लघवी येण्याचा त्रास असतो. यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, दिवसातून किती वेळा लघवी येणं नॉर्मल आहे?

bladder health

निरोगी व्यक्ती

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एक निरोगी व्यक्ती साधारपणे ५-८ वेळा लघवीला जाते. तर काहींची ही रेंज ४-१० वेळा अशीही असू शकते. हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतं.

kidney function

पाणी

याशिवाय तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता यावर तुमच्या लघवीचं प्रमाण ठरतं. जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर तुम्हाला लघवीला देखील जास्त वेळा जावं लागेल.

hydration and urination

वय आणि शरीरातील बदल

जसं वय वाढतं त्यानुसार तुमची किडनी आणि ब्लॅडरची कार्यक्षमता बिघडते. त्यामुळे लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये हे प्रमाण वेगळं असू शकतं. तर ६० वयोगाटातील खालील लोकांमध्ये हे प्रमाण ५-८ असणं सामान्य मानलं जातंय.

urine frequency causes

महिलांमध्ये बदल

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लघवीचं प्रमाण जास्त असू शकतं. ज्या महिला प्रेग्नेंट असतात त्यांच्या गर्भायशयाचा दबाब ब्लॅडरवर येऊ लागते. त्यामुळे त्यांना जास्त वेळा लघवीचा जावं लागू शकतं.

nocturia symptoms

आहार

तुमच्या आहारातील पदार्थांचा देखील यावर परिणाम होतो. कॅफेन, अल्कोहोल आणि काही प्रकारच्या औषधांमुळे लघवीच्या प्रमाणात बदल होतो.

urinary tract health

रात्री लघवी होणं

रात्रीच्या वेळेस म्हणजे झोपेत असताना एकदा लघवीला जाणं सामान्य मानलं जातं. मात्र जर तुम्हाला सतत लघवीला जावं लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

urine habits

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा