Manasvi Choudhary
सध्या धावपळीच्या जीवनशैलीत कामाचा वाढता ताण यामुळे अनेकांना सतत डोकेदुखीचा त्रास उद्भवतो.
अनेकांना हा त्रास सामान्य समजून दुर्लक्ष करता मात्र आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते.
वारंवारं डोकेदुखी होत असेल तर तुम्ही त्यामागची कारणे आणि उपाय समजून घेणे महत्वाचे आहे.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही, ज्यामुळे तीव्र डोकेदुखी सुरू होऊ शकते.
ऑफिसचे टेन्शन, कौटुंबिक ताण किंवा नैराश्यामुळे टेन्शन येते त्यामुळे डोकेदुखी उद्भवू शकते.
पुरेशी झोप न मिळाल्याने किंवा झोपेचे वेळापत्रक बिघडल्याने डोकेदुखीची समस्या वारंवार उद्भवते.
मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर सतत तास न् तास बसल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोके दुखू लागते.
१)आले आणि पुदिन्याचा चहा बनवून प्या.
२) सतत टिव्ही आणि मोबाईल फोन बघणे टाळा.
३) डोळ्यांना विश्रांती द्या.
४) गरम पाण्याचा शेक घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.