Shreya Maskar
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी फ्रेंच फ्राइज ही चमचमीत रेसिपी बनवा.
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी ब्रेडचे तुकडे , लाल मिरची पावडर, काळी मिरी, मीठ, तेल आणि टोमॅटो सॉस इत्यादी साहित्य लागते.
फ्राइज बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये लाल मिरची पावडर, काळी मिरी, मीठ, तेल आणि टोमॅटो सॉस हे सर्व छान मिक्स करून घ्या.
आता ब्रेडचे उभे तुकडे करून मैद्यात घोळवून घ्या.
मंद आचेवर तेल गरम करून त्यात ब्रेडचे तुकडे खरपूस तळून घ्या.
तयार झालेले फ्राइज बनवलेल्या मसाल्यामध्ये मस्त घोळवून घ्या.
शेवटी फ्रेंच फ्राइजचा मेयोनीज सोबत आस्वाद घ्या.
फ्रेंच फ्राइजची चव आणखी वाढवण्यासाठी तुम्ही चिली फ्लेक्स आणि थोडे बेसनही टाकू शकता.