Shreya Maskar
सिताफळ आईस्क्रीम बनवण्यासाठी सिताफळाचा पल्प, दूध, क्रिम किंवा साय, मिल्क पावडर, साखर इत्यादी साहित्य लागते.
सिताफळ आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम सिताफळाचा गर मिक्सरमध्ये टाकून पल्प काढून घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दूध, मिल्क पावडर, साखर आणि क्रिम टाकून रस करून घ्या.
आता या मिश्रणात दुधाची साय टाका.
पुन्हा एकदा हे सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या.
आईस्क्रीम सेट करण्यासाठी हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवून द्या.
आईस्क्रीमवर आवडते ड्रायफ्रूट्स घालायला विसरू नका.
८ ते ९ तासांत थंडगार सिताफळ आईस्क्रिम घरच्याघरी तयार झाला.