Shreya Maskar
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी बटाटे, थंड पाणी, मीठ, कॉर्नफ्लोर इत्यादी साहित्य लागते. तुम्हाला हवे तसे योग्य प्रमाण यात टाका.
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या.ल त्यानंतर उभे, पातळ काप करा आणि पाण्यात भिजवून घ्या.
कापलेले बटाटे आता साधारण १५ ते २० मिनिटे थंड पाण्यात भिजत ठेवा. यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि बटाटा कुरकुरीत होतात.
बटाटे पाण्यातून काढून स्वच्छ कापडावर कोरडे करायला ठेवून द्या. सर्व पाणी निघून जाईल याची काळजी घ्या
कोरडे झालेले बटाटे एका ताटात काढून त्यावर चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लोर घाला. कॉर्नफ्लोर बटाट्याचे पाणी शोषून घेईल.
कॉर्नफ्लोर हलक्या हाताने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून बटाट्याचे गोल्डन फ्राय करा आणि खुसखुशीत गोल्डन फ्राय करा.
फ्रेंच फ्राइज खुसखुशीत हवे असतील तर तळताना तेल खूप गरम असणे महत्त्वाचे आहे. यामुळे फ्रेंज फ्राइज अधिक काळ कुरकुरीत राहतात.
तुम्ही यात पेरी पेरी मसाला टाकू देखील टाकू शकता. फ्रेंज फ्राइज अधिक चटपटीत होती. तुम्ही मुलांना डब्यासाठी देखील हा पदार्थ देऊ शकता.