Shreya Maskar
थंडीत जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश ठेवा. तुम्ही नाश्त्याला गावाकडे बनवतात अगदी तसे बाजरीचे जाळीदार घावणे बनवा.
बाजरीचे जाळीदार घावणे बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे, ओवा, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, कांदा, कोथिंबीर, दही, गाजर आणि तीळ इत्यादी साहित्य लागते.
बाजरीचे जाळीदार घावणे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरव्या मिरच्या, ओवा आणि जिरे घालून एक पेस्ट तयार करा. पेस्ट पातळ करू नका.
एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, दही आणि किसलेला गाजर घालून मिक्स करा.
यात वाटीभर पाणी टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर तवा तापवून त्यावर तेल शिंपडा. त्यानंतर पांढरे तीळ पसरवून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.
आता एका घावण्याचे पीठ गोल पसरवून चांगले खरपूस भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय करा.
आता गरमागरम बाजरीचे जाळीदार घावणे हिरव्या चटणीसोबत खाऊ खा. तसेच गावाकडे हा पदार्थ चहासोबत सकाळच्या नाश्त्याला खाल्ला जातो.