Goa Tourism : गोव्यातील 'या' किल्ल्यावरून पाहा अरबी समुद्राचे विहंगम दृश्य

Shreya Maskar

अगुआडा किल्ला

अगुआडा किल्ला हा गोव्यातील एक महत्त्वाचा, ऐतिहासिक पोर्तुगीज किल्ला आहे. हा किल्ला 1612 मध्ये बांधला गेला.

Fort | google

मांडवी नदी

अगुआडा किल्ला अरबी समुद्राच्या काठावर, मांडवी नदीच्या मुखाशी आहे. अगुआडा किल्ल्याचा गोवा मुक्ती संग्रामात महत्त्वाचा सहभाग होता.

Fort | google

संरक्षण

पोर्तुगीजांनी डच आणि मराठ्यांच्या आक्रमणांपासून संरक्षणासाठी अगुआडा किल्ला बांधला होता.

Fort | google

पाण्याचे स्रोत

अगुआडा किल्ला गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. जहाजांसाठी गोड्या पाण्याचा पुरवठा करणारा स्रोत असल्याने किल्ल्याला 'अगुआडा' (पाणी) हे नाव मिळाले.

Fort | google

स्थापत्यकला

अगुआडा किल्ला हा पोर्तुगीज लष्करी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. अगुआडा किल्ल्यामध्ये भक्कम तटबंदी, बुरुज, खंदक आणि गुप्त मार्ग यांचा समावेश आहे.

Fort | google

तोफा

अगुआडा किल्ल्यावर पोर्तुगीजांच्या काळात एकूण 79 तोफा होत्या, ज्या बेटाचे रक्षण करण्यासाठी वापरल्या जात असत; हा किल्ला गोव्याच्या उत्तर भागात आहे.

Fort | google

दीपगृह

अगुआडा किल्ल्याजवळील दीपगृह हे आशियातील सर्वात जुन्या दीपगृहांपैकी एक आहे. जे 1864 मध्ये बांधले गेले होते. दीपगृह किल्ल्याचाच एक भाग म्हणून ओळखले जाते.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : संगमेश्वरमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' धबधबा

Konkan Tourism | yandex
येथे क्लिक करा...