Konkan Tourism : संगमेश्वरमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' धबधबा

Shreya Maskar

कोकण

धोधवणे धबधबा हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात, नायरी-तिवरे गावाजवळ आहे.

Waterfall | yandex

धोधवणे धबधबा

कोकणातील हा सुंदर आणि बारमाही वाहणारा धबधबा आहे. तुम्ही येथे हिवाळ्यात तुम्ही मजा-मस्ती करू शकता.

Waterfall | yandex

सह्याद्रीचे सौंदर्य

धोधवणे धबधबा सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला एक सुंदर धबधबा आहे, जो पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो. येथे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देतो.

Waterfall | yandex

घनदाट जंगल

धोधवणे धबधबा उंच डोंगरातून कोसळतो आणि त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. येथे तुम्हाला हिरवीगार वनराई पाहायला मिळेल.

Waterfall | yandex

ट्रेकिंग

धोधवणे धबधबा ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. तुम्ही येथे मित्रमंडळीसोबत नक्की जा. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Waterfall | yandex

कसं जाल?

संगमेश्वरला येऊन तुम्ही बस किंवा रिक्षाने धोधवणे धबधब्याजवळ जाऊ शकता. हा कमी परिचित असलेला धबधबा आहे. मात्र येथे भन्नाट सौंदर्य अनुभवता येते.

Waterfall | yandex

गावरान जेवण

संगमेश्वरला गेल्यावर तुम्हाला गावरान जेवणाची चव चाखता येईल. त्यामुळे गावाकडे गेल्यावर वन डे पिकनिकसाठी येथे आवर्जून जा.

Waterfall | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Waterfall | yandex

NEXT : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

Historical Places In Maharashtra | google
येथे क्लिक करा...