Shravan 2025: श्रावण उपवासासाठी 'हे' ७ हेल्दी फूड आणि पौष्टिक पदार्थ पर्याय ठरतील फायदेशीर

Dhanshri Shintre

श्रावण सोमवार

श्रावण महिन्यात दर सोमवारी उपवास केल्यास अनेक महिलांना थकवा व अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते.

उपवास

श्रावणात उपवास करताना अशक्तपणा येऊ नये म्हणून कोणते पौष्टिक पदार्थ खावे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

शिंगाडा पुरी

ही डिश फायबरने भरलेली असून ती तुमचं पोट भरते आणि दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करते.

साबुदाणा खिचडी

उपवासात खाल्ला जाणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी, ज्यात बटाटा आणि शेंगदाण्याचा स्वादिष्ट समावेश करता येतो.

मखाना खीर

मखाना म्हणजेच फॉक्सनट्स हे प्रथिने आणि फायबरयुक्त असतात, त्याची पौष्टिक खीर बनवून उपवासात खाणे फायदेशीर ठरते.

राजगिरा शिरा

फायबर, लोह आणि प्रथिनांनी भरलेले राजगिरा पीठ वापरून तुम्ही स्वादिष्ट आणि पौष्टिक शिरा उपवासासाठी बनवू शकता.

भगर भात

उपवासात सर्वाधिक खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे, कारण तो सहज बनतो आणि पचनासाठीही हलका असतो.

रताळे

उकडलेले रताळे आणि शिंगाडा पीठ एकत्र करून तुम्ही उपवासासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक पोळी सहज तयार करू शकता.

NEXT: श्रावण महिन्यात दिल्लीतील 'या' रहस्यमय शिवमंदिरांना भेट द्यायला विसरू नका

येथे क्लिक करा