Shravan 2025: श्रावण महिन्यात दिल्लीतील 'या' रहस्यमय शिवमंदिरांना भेट द्यायला विसरू नका

Dhanshri Shintre

श्रावण कधी आहे?

या वर्षी पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात २५ जुलैपासून होत असून, समारोप २३ ऑगस्टला होणार आहे.

भगवान शिवाला अर्पण

संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाला अर्पण केलेला असतो, ज्यात भक्त किमान एकदा तरी शिवमंदिरात भेट देतात.

दिल्ली-एनसीआर

दिल्ली-एनसीआरमध्ये राहात असाल, तर श्रावण महिन्यात या ५ दुर्लक्षित शिव मंदिरांना जरूर भेट द्यावी.

प्राचीन शिवमंदिर

दिल्लीच्या कालकाजी परिसरातील हे प्राचीन शिवमंदिर ऐतिहासिक मानलं जातं, श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी जरूर जावं.

नीलकंठ महादेव मंदिर

श्रावण महिन्यात जनकपुरीतील मीनाक्षी गार्डनमधील नीलकंठ महादेव मंदिराला जरूर भेट द्या, ते भक्ती आणि ऊर्जा प्रसिद्ध आहे.

गुहा शिव मंदिर

चाणक्यपुरीतील रहस्यमय गुहेत वसलेले शिवमंदिर मानसिक शांतीसाठी प्रसिद्ध असून, येथे शिवलिंगाचे दर्शन शांतता देते.

बाबा रामेश्वर महादेव मंदिर

दिल्लीच्या बवाना परिसरातील बाबा रामेश्वर महादेव मंदिर पूर्वी प्रसिद्ध होते, सावनमध्ये येथे दर्शनासाठी जरूर जावं.

अग्रसेन की बाओली शिवमंदिर

कॅनॉट प्लेसमधील अग्रसेन की बाओलीजवळ वसलेले शिव मंदिरही सावनमध्ये भेट देण्यासाठी एक पवित्र ठिकाण आहे.

NEXT: श्रावण महिन्यात शिवलिंगावर कसे अर्पण करावे बेलपत्र? जाणून घ्या योग्य पद्धत

येथे क्लिक करा