ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईच्या गर्दीपासून लांब शांत वेळ घालवायचा आहे तर मुंबईच्या उत्तरेला एक सुंदर ठिकाण आहे. येथे नक्की जा.
निळेशार पाणी, शांत वातावरण आणि स्वच्छ समुद्रकिनारा, या बीचवर तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय राहील.
मनोरी बीच हे प्रसिद्ध ठिकाण असून येथे वीकेंडला अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. या ठिकाणाला मिनी गोवा असेही म्हणतात.
येथे पोहचण्यासाठी तुम्ही मारवे बीचवरुन फेरीने जाऊ शकता. मुंबई एअरपोर्टपासून फक्त १९ किलोमीटर अंतरावर हे बीच आहे. तुम्ही खाजगी वाहन, बस किंवा बोरिवली स्टेशनपासून टॅक्सीने जाऊ शकता.
मुंबईच्या बीचेसमध्ये मनोरी बीच हे सर्वात सुंदर आणि शांत बीच आहे. तसेच येथे गर्दी देखील कमी असते.
बीचवर शांत वेळ घालवण्यासह तुम्ही येथे सायकलिंग आणि बोटींगचा देखील आनंद घेऊ शकता. येथे जवळच समुद्रेश्वर मंदिर, ग्लोबल विपासना पॅगोडाला असून तुम्ही भेट देऊ शकता.
जर तुम्ही पुणे किंवा नाशिक सारख्या शहरातून येथे फिरायला येत असाल तर येथे पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्स आणि कॉटेजेस सुद्धा आहेत.