ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फॅटी लिव्हर ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते. त्याचा यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
जास्त प्रमाणात मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा, खराब आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
फॅटी लिव्हरचे आरोग्य सुधारणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
पालकमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. जे लिव्हरची सूज कमी करतात. आणि लिव्हर डिटॉक्स करण्यात मदत करतात.
या बियांमध्ये मॅग्नेशियम तसेच हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन भरपूर असतात. हे लिव्हरच्या पेशींची दुरुस्ती करतात. आणि लिव्हरचे कार्य सुधारतात.
काळे चणे आणि राजमामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात. हे लिव्हरमध्ये चांगले कोलेस्ट्रोल वाढवून फॅटचे प्रमाण कमी करतात.
बदाम मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ईने समृद्ध असतात. हे लिव्हरमध्ये फॅट जमा होण्यापासून रोखते.