Cholesterol control: औषधं सोडा! तुमच्या दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या

आजकाल कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या केवळ वयस्करांमध्येच नाही तर तरुणांमध्येही दिसून येतेय. अनेकदा कोलेस्ट्रॉल वाढलंय हे शरीराला लगेच जाणवत नाही. कारण त्याची ठळक लक्षणं दिसत नाहीत. मात्र रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

cholesterol control | saam tv

औषधं बंद करू नका

कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून प्रत्येक वेळी केवळ औषधांवरच अवलंबून राहावं लागतं असं नाही. मात्र डॉक्टरांनी दिलेली औषधं स्वतःहून बंद करणं किंवा उपचारांमध्ये बदल करणं योग्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असताना जीवनशैलीत काही बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

how to lower cholesterol | saam tv

सॉल्युबल फायबर

ओट्स, डाळी, चिया सीड्स आणि जवस यांसारख्या पदार्थांमध्ये सॉल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असतं. हे फायबर पचनसंस्थेत कोलेस्ट्रॉलशी जोडलं जाऊन ते शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करू शकतं.

lower LDL naturally | saam tv

दररोज पुरेसं सॉल्युबल फायबर घ्या

अभ्यासांनुसार, दररोज 5 ते 10 ग्रॅम सॉल्युबल फायबर घेतल्याने LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल साधारण 5 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होऊ शकते. नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करणं किंवा स्मूदीमध्ये जवस घालणं यासारखे छोटे बदलही उपयोगी ठरू शकतात.

heart health | saam tv

प्लांट स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्सयुक्त

फळं, भाज्या, कडधान्यं, नट्स आणि बिया यांसारख्या काही पदार्थांमध्ये प्लांट स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्स असतात. हे घटक शरीरात कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतात. दररोज सुमारे 2 ग्रॅम स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्स घेतल्यास LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल 10 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होऊ शकते.

soluble fiber for cholesterol | saam tv

शारीरिक हालचाल

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम किंवा नियमित शारीरिक हालचाल महत्त्वाची ठरते. आठवड्यातून पाच दिवस दिवसाला सुमारे 30 मिनिटं वेगाने चालण्यासारखी साधी शारीरिक क्रियाही फायदेशीर ठरू शकते.

walking for heart health | saam tv

साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स

आहारातून खूप जास्त साखर घेतल्यास ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढू शकते आणि त्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोडा आणि इतर साखरयुक्त पेयं, कँडी, पेस्ट्री, मैद्यापासून बनवलेले पदार्थ आणि पांढरा ब्रेड यांचं सेवन कमी करणं फायदेशीर ठरू शकतं.

healthy lifestyle | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil belly button | saam tv
येथे क्लिक करा