ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नाशिक शहरात अनेक सुंदर ठिकाण आहेत. येथे तुम्ही मित्र-कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवू शकता.
विहिगाव धबधबा, जो अशोका धबधबा म्हणूनही ओळखला जातो, सुमारे १२० फूट उंच असून, पश्चिम घाटातील हिरव्यागार जंगलात वसलेला हा धबधबा आहे. वीकेंडला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यात वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. निसर्गरम्य दृश्ये, हिरवीगार पर्वतरांगा, धबधबे आणि शांत वातावरणासाठी हे ठिकाण ओळखले जाते.
नाशिकजवळचा सोमेश्वर धबधबा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, ज्याला 'दूधसागर फॉल्स' असेही म्हणतात. तुम्ही येथे ट्रेकिंग करण्याचा आणि निसर्गरम्य वातावरणात निवांत वेळ घालवण्याचा आनंद घेऊ शकता.
हा किल्ला नाशिकपासून ४७ किलोमीटर अंतरावर आहे. ट्रेकिंगसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे.
नाशिकपासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असून नाशिकपासून २८ किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.