ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लोक मोबाईल फोन वापरल्यामुळे रात्री उशिरा झोपतात. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. असे केल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, जाणून घ्या.
झोपेचा अभाव शरीराचे संतुलन बिघडवतो. हार्मोन्स असंतुलित होतात आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.
रात्री उशिरा झोपल्याने स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमकुवत होते. दिवसभर थकवा जाणवतो आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीर थकलेले राहते आणि दिवसभर कमी ऊर्जा असते. काम करावेसे वाटत नाही.
दररोज रात्री उशिरापर्यंत झोपत असाल तर रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
मोबाईल फोन वापरणे आणि रात्री उशिरापर्यंत झोपणे यामुळे मूड खराब होतो आणि तणाव सहज वाढतो. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
रात्री उशिरा झोपल्याने झोपेचा अभाव होतो. झोपेअभावी भूक वाढते आणि शरीरात चरबी जमा होऊन वजन वाढते.