ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'काळ्या सोन्याचे शहर' म्हणून ओळख असणारा चंद्रपूर जिल्हा, अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे.
बल्लारपूर किल्ला हे चंद्रपूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या किल्ल्याचे निर्माण गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाहने केले होते.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. येथे तुम्ही बंगाल वाघासह अन्य प्राणी देखील पाहू शकता.
शांत अन् सुंदर ठिकाण म्हणजे नीळा पाणी. हिरवेगार झाडांनी वेढलेले हे ठिकाण पिकनिसाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे.
१४०० ते १५०० च्या काळात गोंड राजांनी हा किल्ला उभारला होता. ऐतिहासिक महत्व असलेला हा किल्ला शहराच्या मध्यभागी स्थित आहे.
महाकाली देवीला समर्पित हे मंदिर चंद्रपूरमधील एक प्रमुख अध्यात्मिक स्थळ आहे. येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.
नैसेर्गिक सुंदरता आणि शांत वातावरण कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.