ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला भंडारा जिल्ह्यात तुम्ही शांत, सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊ शकता.
कोरंभी मंदिर हे भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि प्रमुख धार्मिक स्थळ आहे. मंदिराच्या परिसरातील शांत आणि पवित्र वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.
रावणवाडी धरण हे नैसर्गिक सुंदरताने परिपूर्ण ठिकाण आहे, म्हणून तुम्ही येथे पिकनिकचा प्लान करु शकता.
भंडारापासून ६० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. येथे तुम्ही वाघ, बिबट्यासह विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहू शकता.
जर तुम्ही प्राणीप्रेमी किंवा निसर्गप्रेमी असाल तर येथे भेट द्यायला विसरु नका. हे ठिकाण भंडारापासून फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे.
ऐतिहासिक महत्व असेलल्या अंबागड किल्ल्याला आवर्जून भेट द्या. तुम्ही येथे ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
गोसेखुर्द धरण याला लोक इंदिरा सागर धरण म्हणूनही ओळखतात. या धरणांमुळे अनेक गावांना पाणी पुरवठा होतो. शांत वातावरण आणि सुंदर निसर्ग, पिकनिकसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.