ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील खान्देश भागात स्थित नंदुरबार जिल्हा १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून वेगळा करुन अस्तित्वात आला. या जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
तोरळमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील शांत अन् सुंदर हिल स्टेशन आहे. हे ठिकाण हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या आणि कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेऊ शकता.
उनपदेव हे त्याच्या नैसर्गिक गरम पाणीच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या या अध्यात्मिक ठिकाणाला भेट द्यायला विसरु नका.
अक्राणी तहसीलमध्ये स्थित अष्टंबा येथील आदरणीय अध्यात्मिक स्थान आहे. दक्षिण गुजरात आणि उत्तर - पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आदिवासी मेळ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक अष्टंबा मेळ्यासाठी हे प्रसिद्ध आहे.
ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व असलेल्या या ठिकाणाला दक्षिण काशी असेही म्हणतात. तापी नदीच्या काठावर वसलेल्या या ठिकाणावरुन तुम्ही निसर्गाच्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
धुक्याने वेढलेले डोंगर अन् शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण पिकनिकसाठी परफेक्ट ठिकाण आहे.
सीता खाई धबधबा आपल्या शांत, सुंदर आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.