ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सेकंड हँड फोन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
जर तुम्हाला कमी किमतीत जुना मोबाईल घ्यायचा असेल, तर सेकंड हँड फोन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
जुना मोबाईल खरेदी करण्यात काही नुकसान नाही पण वॉरंटी असलेला फोन घ्या जेणेकरून फोन खरेदी केल्यानंतर जर काही भाग खराब झाला तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
जुना फोन खरेदी केल्यानंतर, प्रथम मोबाईल फॉरमॅट करा, कारण फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस असू शकतो.
पैसे देण्याची घाई करु नका, प्रथम फोनची स्थिती नीट तपासा. मोबाईलच्या बॉडी क्रॅक आहे की नाही हे नीट तपासा.
जर फोन खूप जुना असेल तर असा मोबाईल खरेदी करु नका, कारण खूप जुन्या फोनमध्ये सिक्युरिटी अपडेट मिळत नाहीत.
जर तुम्ही जुना फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याआधी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर फोनची किंमत चेक करा.