ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात फिरण्यासाठी अनेक शांत, सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
मुंबई- पुण्यापासून जवळच असलेले लोणावळा हिल स्टेशन धावपळीच्या जीवनातून शांत वेळ घालवण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग, वॉटर पार्क आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पिकनिकसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.
लोणावळ्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे लोहगड किल्ला. येथे तुम्ही ट्रेकिंग करु शकता तसेच या किल्ल्यावरुन तुम्ही विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
चारही बाजूने हिरवळीने वेढलेले हे लेक महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.
ड्यूकचे नाक या ठिकाणाला नागफणी किंवा कोब्राचा हुड असेही म्हणतात. येथील थंड वातावरण आणि नयनरम्य दृश्ये तुमच्या मनाला भुरळ घालतील.
कार्ला लेणी येथे बौद्ध मठ, सुंदर शिल्पे तसेच एकविरा देवीचे मंदिर आहे. भाजा लेण्यांमध्ये १४ प्राचीन बौद्ध स्तूप आहेत. या ऐतिहासिक ठिकाणी नक्की भेट द्या.