ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या सर्वांनाच ग्लोइंग स्कीन हवी असते, परंतु वाईट जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे चेहऱ्यावर परिणाम होतो.
आज आम्ही तुम्हाला अशा चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.
शरीराला आवश्यक पुरेसे पाणी न प्यायल्याने त्वचेतील हायड्रेशन कमी होते. यामुळे ब्रेकआउट्स होऊन चेहऱ्यावर पिंपल्स होऊ शकतात.
जर तुम्ही जास्त गोड पदार्थ खात असाल तर आजच ही सवय सोडून द्या. कारण जास्त गोड पदार्थांमुळे पिंपल्स होऊ शकतात.
जर तुमच्या चेहऱ्यावर आधीच पिंपल्स असतील आणि तुम्ही त्यांना वारंवार स्पर्श करत असाल तर तुम्ही हे करणे टाळावे कारण यामुळे पिंपल्सची समस्या वाढू शकते.
मेकअप ब्रश दररोज वापरल्यानंतर स्वच्छ केला नाही तर हानिकारक केमिकल त्वचेवर चिकटतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
झोपण्याआधी उशीकडे विशेष लक्ष द्या. जर तुमची उशी किंवा उशीचे कव्हर स्वच्छ नसेल तर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.