ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नाशिकमध्ये भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे मालेगाव शहर. या शहरात अनेक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
मालेगाव हे नाशिकमधील सर्वात सुंदर शहर आहे. मालेगावजवळ एक स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन वसलंय, येथे नक्की भेट द्या.
सापुतारा हिल स्टेशन हे महाराष्ट्र- गुजरात सीमेवर आहे. तुम्ही येथे सनसेट पॉइंट, लेक गार्डन, आणि गिरा धबधबे यांसारख्या निसर्गरम्य स्थळांना भेट देऊ शकता. हे ठिकाण मालेगावपासून ९८ किलोमीटर अंतरावर आहे.
शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.
येथील सनसेट पॉईंटला भेट द्यायला विसरु नका. तुम्ही येथून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव घेऊ शकता
निसर्गाच्या सानिध्यात असलेले हा धबधबा पिकनिक स्पॉटसाठी परफेक्ट आहे.
तुम्ही येथे निवांत वेळ घालवू शकता. तसेच तुम्ही येथे बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता.