ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती संभाजी नगर पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखले जायचे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसह ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
हे प्राचीन मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात.
दौलताबाद किल्ला हा अजिंक्य किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्यायला विसरु नका.
अजिंठा लेणी ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. तुम्ही येथे कोरलेली बुद्ध लेणी पाहू शकता.
या ठिकाणाचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कैलास मंदिर. येथे नक्की भेट द्या.
इतिहास आणि वास्तुप्रेमींसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. मुघल आजम शाह यांनी त्यांची आई दिलरास बानू बेगम यांच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधले होते.
गोदावरी नदीवर वसलेले हे डॅम पिकनिकसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथील नैसर्गिक सुंदरता पाहून तुमच्या मनाला नक्की भुरळ पडेल.