Hidden Hill station: लोणावळा, खंडाळा आता सोडा; वसईपासून जवळ असलेल्या 'या' कमी गर्दीच्या हिल्स स्टेशनवर नक्की जाऊन या

Surabhi Jayashree Jagdish

विल्सन हिल्स

गुजरातजवळ असलेलं एक कमी प्रसिद्ध पण सुंदर हिल स्टेशन म्हणजे विल्सन हिल्स. हे ठिकाण थेट गुजरातमध्ये, वलसाड जिल्ह्याच्या धरमपूर तालुक्यात आहे

हिडन हिल स्टेशन

विल्सन हिल्स हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. याला 'हिडन हिल स्टेशन' मानले जाते, कारण अजूनही इथे पर्यटकांची गर्दी कमी असते.

सौंदर्य

पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य पूर्णपणे बहरलेलं असतं. हिरवीगार झाडी, धुक्याने वेढलेले डोंगर आणि अनेक धबधबे पाहण्यासाठी हा उत्तम वेळ असतो.

पावसाळा

पावसाळ्यात इथे अनेक लहान-मोठे धबधबे तयार होतात, जे पाहण्यासारखे असतात. हे दृश्य खूपच मनमोहक आणि शांत असते.

बिलपुडी धबधबा

विल्सन हिल्सजवळील हा एक मोठा धबधबा आहे. इथे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी पर्यटक येतात.

पंचमढी पॉईंट

या पॉईंटवरून दरीचे आणि डोंगरांचे विहंगम दृश्य दिसते. पावसाळ्यात इथे धुकं आणि ढगांची गर्दी असते, ज्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होतं.

माहोल गाव

विल्सन हिल्सच्या जवळ असलेलं हे आदिवासी पाड्याचं गाव आहे, जिथे तुम्ही स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता.

वसईपासून जवळ

वसईपासून विल्सन हिल्स सुमारे १८८ किलोमीटर अंतरावर आहे. यासाठी तुम्हाला जवळपास ४ तास लागू शकतात.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा