Bhandara Tourism: लोणावळा खंडाळा राहूद्या; पावसाळ्यात भंडाऱ्यामध्ये या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरून याच

Surabhi Jayashree Jagdish

भंडारा जिल्हा

पावसाळ्यात फिरायला जायचा विचार करत असाल तर भंडारा जिल्हा निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.

कुठे फिरू शकता?

भंडाऱ्यामध्ये हिरवीगार डोंगररांगा, धबधबे, तलाव आणि प्राचीन मंदिरे पर्यटकांना आकर्षित करतात.

नागर्देवी जलप्रपात

हे ठिकाणी लाखनी तालुक्यात असून पावसाळ्यात वाहणारा सुंदर आणि निर्झर जलप्रपात मोहून टाकतो. याठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातील शांत वातावरण आहे.

अंबागड किल्ला

पवनी तालुक्यात असलेला हा ऐतिहासिक किल्ला डोंगरमाथ्यावर वसलेला आहे. पावसाळ्यात किल्ल्याच्या आजूबाजूला हिरवळ उगवतं आणि वातावरण खूप सुंदर दिसतं. इथला इतिहास आणि निसर्गाचा संगम अनुभवता येतो.

कोका जंगल आणि तलाव

हे जंगल वन्यजीव निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. इथे बिबट्या, हरिण, ससे यांचं दर्शन होते. तलावाजवळ निसर्गरम्य ठिकाणी मुक्कामाची सोय आहे.

परसवाडा तलाव

हे ठिकाण साकोलीपासून जवळ असून शांत, निसर्गरम्य आहे. कुटुंबासोबत एक दिवसाची सहल घालवण्यासाठी उत्तम होऊ शकते.

कचारगड लेणी

हे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात असलेल्या या नैसर्गिक लेणी आहे. इथे एका मोठ्या गुहेत शिवलिंग आहे. पावसाळ्यात आजूबाजूचे डोंगर हिरवेगार होतात आणि गुहेच्या परिसरात खूप शांतता असते.

Malad Tourism : लांब कशाला, पावसाळ्यात मालाडजवळच फिरा 'ही' ठिकाणं; आताच नोट करा लोकेशन

malad monsoon one day picnic | saam tv
येथे क्लिक करा