Surabhi Jayashree Jagdish
मुंबईतच असे काही कमी गर्दीचे बीच आहेत जे तुम्हाला गोव्याचा अनुभव देतात. मिनी गोव्याचा अनुभव देतात. मुंबईतील हे हिडन बीच फार क्वचितच लोकांना माहिती आहेत.
मुंबईत अनेक प्रसिद्ध बीच आहेत. पण काही ठिकाणं अजूनही हिडन जेम म्हणून ओळखली जातात. ही ठिकाणं शहराच्या गोंगाटापासून दूर शांत वातावरण देतात. विकेंडला कमी वेळात फिरून येण्यासाठी हे बीच उत्तम पर्याय मानले जातात.
गोव्याचा प्लान करण्यासाठी जास्त वेळ आणि खर्च लागतो. त्यामुळे अनेकजण त्यांच्या जवळचे पर्याय शोधतात. मुंबईतील हे बीच कमी बजेटमध्ये तुम्हाला गोव्याचा फील देतील.
आक्सा बीच हा बीच स्वच्छ किनारा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. इथे संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताचं दृश्य खूप सुंदर दिसतं. गर्दी कमी असल्यामुळे शांतपणे फिरण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानलं जातं.
मनोरी बीचला ‘मिनी गोवा’ असंही म्हटलं जातं कारण इथलं वातावरण खूप रिलॅक्स वाटतं. नारळाची झाडं, बीच शॅक्स आणि शांत समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. फेरीने जाण्याचा अनुभवही अनेकांसाठी खास ठरतो.
गोराई बीच हा बीच निसर्गरम्य वातावरण आणि स्वच्छ हवेसाठी ओळखला जातो. इथून जवळच अनेक रिसॉर्ट्स आणि मनोरंजनाची ठिकाणं आहेत, त्यामुळे विकेंड ट्रिपसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.
वर्सोवा बीच हा बीच स्वच्छता मोहिमेमुळे विशेष चर्चेत आला होता. सकाळी आणि संध्याकाळी याठिकाणी फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात.
मढ आयलँड हे ठिकाण शहराच्या धावपळीपासून दूर शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी समुद्रकिनाऱ्यासोबत हिरवळ आणि जुन्या पोर्तुगीज शैलीची झलकही पाहायला मिळते. अनेक चित्रपट आणि शूटिंगसाठी हे ठिकाण निवडलं जात असल्यामुळे पर्यटकांमध्ये याची वेगळीच क्रेझ आहे.