Manasvi Choudhary
जून महिन्याला सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसात फिरण्यासाठी पर्यटक खास पिकनीकचे आयोजन करतात.
तुम्हीदेखील पिकनीकसाठी प्रसिद्ध ठिकाण शोधत असाल तर ही वेबस्टोरी पूर्ण वाचा.
पावसाळ्यात निसर्गाच्या समृद्ध ठिकाणी तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर तुम्ही धबधब्यांना भेट देऊ शकता. पावसाळ्यात येथील दृश्य मनाला मोहून टाकते.
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण म्हणजे इगतपुरी. पावसाळ्यात तुम्हाला या ठिकाणी ट्रेकिंग, उद्याने, मंदिर आणि निसर्गरम्य परिसरात वेळ घालवता येईल.
पावसाळ्यात माळशेज घाटातील पर्यटकांची गर्दी होते. घाटमाथ्यावरून कोसळेणार धबधबे अन् ढगांमध्ये हरवलेलं धुकं हे पाहण्यासाठी पर्यटक येतात.
भंडारदरा नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. मुंबईपासून १६५ किलोमीटर असलेल्या या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येईल. येथील पोहोचल्यानंतर तु्म्ही कळसूबाई शिखर, रंधा धबधब्याला भेट देऊ शकता.
तामिनी घाट हे पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. तामिनी घाटातील वळणदार रस्ते, धुकं हा प्रवास कायम आठवणीत राहील.