नारायणराव पेशव्यांची हत्या कोणत्या कारणाने आणि कशी झाली?

Surabhi Jayashree Jagdish

नारायणराव पेशवे

मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणजे नारायणराव पेशवे यांची हत्या.

कारण

नारायणराव पेशवे यांची हत्या होण्यामागे मुख्य कारण होतं ते म्हणजे सत्तालालसा आणि अंतर्गत कटकारस्थान.

रघुनाथराव पेशवे

नारायणराव पेशवे यांचे काका रघुनाथराव पेशवे यांना पेशवेपद मिळवण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यांनीच या हत्येचा कट रचला.

नियम

रघुनाथराव हे नानासाहेब पेशव्यांचे बंधू आणि थोरले माधवराव आणि नारायणराव यांचे काका होते. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांनाच पेशवेपद मिळावं अशी त्यांची इच्छा होती. कारण ते अनुभवी होते. मात्र, नियमानुसार नारायणराव पेशवे बनले.

नजरकैद

नारायणरावांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यातच नजरकैदेत ठेवलं होतं. ज्यामुळे रघुनाथरावांमध्ये तीव्र असंतोष आणि द्वेष निर्माण झाला.

आनंदीबाईंची भूमिका

घुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाई यांची या कटात महत्त्वाची भूमिका होती. असं मानलं जातं की, रघुनाथरावांनी गारद्यांना नारायणरावांना फक्त पकडून/कैद करून आणण्याचा हुकूम दिला होता.

'ध चा मा'

परंतु, आनंदीबाईंनी तो हुकूम बदलून "नारायणरावास धरावे" ऐवजी "नारायणरावास मारावे" असा केला. मराठीतील 'ध चा मा करणे' ही म्हण याच घटनेवरून रूढ झाली आहे. यामुळे गारद्यांनी थेट नारायणरावांची हत्या केली.

Marathi History: 'पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' असं का म्हटलं जातं?

peshwai | saam tv
येथे क्लिक करा