Tanvi Pol
साताऱ्याच्या कराड तालुक्यात वसलेला आगाशिव डोंगर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल किंवा शहराच्या गोंगाटातून काही वेळ शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर आगाशिव डोंगर हा एक परिपूर्ण पर्याय ठरतो.
कराड शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगर आहे. विशेषत ट्रेकिंगप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
आगाशिव डोंगरावर तुम्हाला एक लेणी दिसून येते. जी जखीणवाडी गावात आहे.
या डोंगरावर चढाई करताना आसपास दिसणारे विस्तीर्ण निसर्गदृश्य, सह्याद्रीच्या रांगांचे सौंदर्य आणि डोंगरावरून दिसणारा कराड शहराचा विहंगम नजारा मन मोहवून टाकतो.
सुर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी येथे येणं हा एक वेगळाच अनुभव असतो.
अनेक पर्यटक आणि फोटोग्राफर्स या ठिकाणी खास अशा क्षणांची छायाचित्रं टिपण्यासाठी भेट देतात