ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पदार्थ जास्त काळ टिकावा लवकर खराब होऊनये यासाठी आजकाल सर्वजण फ्रिजचा वापर करतात.
फ्रिजमध्ये पदार्थ बराच काळ चांगले राहतात. लवकर खराब होत नाहीत.
मात्र फ्रिजमध्ये काही पदार्थ अजिबात ठेवायचे नसतात. त्यात लगेचच विष तयार होते.
फ्रिजमध्ये सोललेल्या लसूण पाकळ्या ठेवू नका. त्याने लसूण लवकर खराब होतो.
रात्रीचा भात अनेकांच्या घरात उरतो. हा भात जास्तीत जास्त ३ तास फ्रिजमध्ये असावा. त्यापेक्षा जास्त तास झाल्यावर भातात विष तयार व्हायला सुरूवात होते.
कांदा उष्ण ठिकाणी जास्त चांगला राहतो. फ्रिजमध्ये ठेवल्यास तो ओलो होतो आणि त्याला बुरशी चढते.
अद्रक प्रत्येक घरात फ्रिजमध्येच ठेवतात. मात्र त्यामुळे यात अॅसिड तयार होतो. जे शरिरासाठी फार घातक असते.
अनेक व्यक्ती फळं देखील फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र कलिंगड, केळी, आंबा ही फळे कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये.