Surabhi Jayashree Jagdish
सकाळी उठल्यावर पोट आणि पचनतंत्र अतिशय नाजूक स्थितीत असते. या वेळी चुकीचा आहार घेतल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून दिवसाची सुरुवात योग्य आहाराने करणं महत्त्वाचं आहे.
रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्यास गंभीर पचनाचे विकार होऊ शकतात. यामुळे गॅस, अपचन किंवा जळजळ वाढते. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास अॅसिडिटी वाढते. यामुळे छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. पोटावर ताण येऊन दिवसाची सुरुवात खराब होऊ शकते.
सकाळी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास पोटाला त्रास होतो. यामुळे पोटाच्या आतील आवरणावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी जळजळ होऊ शकते.
रिकाम्या पोटी दही किंवा ताक घेतल्यास गॅस होऊ शकतो. काही लोकांना पोट फुगीचा त्रास होऊ शकतो. म्हणून हे पदार्थ नंतरच्या वेळेत घेणं अधिक योग्य ठरतं.
संत्रं, लिंबू, अननस आणि द्राक्षं ही आंबट फळं आहेत. रिकाम्या पोटी खाल्ल्यास अॅसिडिटी आणि जळजळ वाढते. ही फळं जेवणानंतर किंवा थोड्या वेळाने खाणं योग्य असतं.
रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या पचायला कठीण जातात. यामुळे पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. तसंच पेनकिलर घेतल्यास अल्सर होण्याचा धोका वाढतो.