ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेला भरपूर महत्त्व दिलं जातं. पौर्णिमेचा दिवस शुभ देखील मानला जातो.
यावर्षी २१ जूलै रोजी आषाढ पौर्णिमा साजरी केली जाणार. या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा केल्यास पुण्य मिळते.
आषाढ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घरातील केल काढा आणि आंगणामध्ये छान रांगोळी काढा.
आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पिवळे कापड घालणं शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या कामामधील अढतळा कमी होण्यास मदत होते.
आषाढ पौर्णिमेला सकाळी सत्यनारायणाची मूर्ती स्थापित करून त्याला पंचामृताचा अभिषेक करा. त्यानंतर हळद आणि चंदनाचा टिळक देखील लावा.
सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा. पूजा करताना देवासमोर तूपाचा दिवा लावा आणि सत्यनारायणाची आरती करा.
पूजा करताना ''ॐ श्री सत्यनारायणाय नमः , शर्करास्नानं समर्पयामि , शर्करा स्नानान्ते पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयाम'' या मंत्राचा जप करा.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.