ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमावस्याला पितरांची पूजा केली जाते. या दिवशी त्यांना खुश ठेवण्यासाठी विविध उपाय केले जातात.
तुमचे पूर्वज प्रसन्न असतील, तर तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे.
आषाढात येणारी अमावस्या आषाढ अमावस्या म्हणून ओळखली जाते.
पंचांगानुसार, २०२४ची आषाढ अमावस्या 5 जुलै रोजी येत आहे. या दिवशी दान केल्यामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात.
अमावस्येच्या दिवशी सकाळी पवित्र आणि प्रसन्न मनानी स्नान करावे. यावेळी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळल्यास अधीक लाभ होईल.
स्नान केल्यानंतर भगवान श्री विष्णूंची आणि पिररांची पूजा करा आणि यशस्वी जिवनासाठी आशिर्वाद घ्या.
त्यानंतर नैवेद्य दाखवून गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. असे केल्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.