ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एकच उंदीर घरात घुसला की घरातल्या व्यक्तींना नाकीनऊ येते, काहीही केल्या तो घरातून बाहेर जात नाही.
त्यासाठी घरगुती उपाय आहेत ज्याच्या मदतीने उंदरांना बाहेर काढणे होईल सोपे.
एक ग्लास पाण्यात लसूण किसून मिसळा, हे पाणी उंदीर फिरतात त्या ठिकाणी शिंपडल्याने उंदीर दूर पळतात
घरातील कानाकोपऱ्यात कापूरच्या वड्या ठेवा असे केल्याने तुम्ही उंदारांना पळवून लावू शकता.
घराच्या दाराजवळ आणि किचनच्या कोपऱ्यात लाल मिरची तिखट शिंपडल्याने उंदीर पळून जाण्याची शक्यता असते.
तुरटीचा पाणी तयार करुन घरातील कोपऱ्यात शिंपडा असे केल्याने उंदीर दूर पळतात
तंबाखूचे बारीक मिश्रण तयार करुन बेसन पीठात टाकावे असे मिश्रण उंदराने खाल्लाने तो बेशुद्द पडतो.
कांद्याचा वास उग्र असल्याने घरातून उंदीर पळून जाण्याची शक्यता असते.
दोन-तीन लवंग घेऊन मलमलच्या कपड्यात बांधून घरातील कोपऱ्यात ठेवल्याने लवंगाच्या वासाने उंदीर पळून जातात.