Shraddha Thik
हिवाळ्यात तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
तीळ आणि गूळ घालून तयार केलेले लाडू हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचे काम करतात.
शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देण्याचे काम तीळ करते. त्याचबरोबर तिळापासून शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.
हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो कारण खोकला आणि सर्दीपासून सुरक्षित ठेवण्याचे कार्य करते.
या बर्फीमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे हाडं मजबूत होतात व हाडांच्या दुखण्याचा त्रास होत नाही.
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांनी हिवाळ्यात तिळाचे लाडू जरूर खावे, कारण त्यात फायबरदेखील असते.
तिळाची चटणी हे ऊर्जा देण्यासाठी प्रभावी आहे. तसेच दम्याच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहेत.