Mobile Network Boost: मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी ‘या’ ट्रिक्स करा फॉलो, फरक लगेच दिसेल

Dhanshri Shintre

मोबाईल

मोबाईल आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे आणि त्यामुळे अनेक कामे सोपी व जलद झाली आहेत.

अडचणी

कधी कधी मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यानं कॉल किंवा इतर काम व्यवस्थित होऊ शकत नाहीत, ज्यामुळे अडचणी येतात.

नेटवर्कच्या समस्या

नेटवर्क कमी असल्यामुळे इंटरनेट स्लो चालते आणि मोबाईलवर काम करणं कठीण होतं. बाहेर असताना लोकांना नेटवर्कच्या समस्येची सतत तक्रार होते.

स्मार्ट टिप्स

जर तुम्ही काही स्मार्ट टिप्स वापरल्या तर कोणताही अॅपशिवाय तुमच्या डिव्हाइसचे नेटवर्क सुधारता येऊ शकते, आणि कनेक्शन मजबूत करता येईल.

मॅन्युअली नेटवर्क

नेटवर्क समस्या असल्यास, डिव्हाइस सेटिंग्जमध्ये जाऊन मॅन्युअली नेटवर्क मोड निवडा. ऑटो मोडमुळे 3G, 4G, 5G स्विचिंगने नेटवर्क कमजोर होऊ शकते.

नेटवर्क प्रकार

सेटिंग्जमधून सिम सेटिंग्जवर जा आणि पसंतीचे नेटवर्क प्रकार 4G/LTE किंवा 5G वर निवडा.

ड्युअल सिम सपोर्ट

जर तुमचा डिव्हाइस ड्युअल सिम सपोर्ट करत असेल, तर इंटरनेटसाठी सिम स्लॉट 1 वापरा, कारण तिथे बहुतेक वेळा चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळते.

नेटवर्क बूस्टर

गुगल प्ले स्टोअरवर नेटवर्क बूस्टर किंवा सिग्नल वाढवणारी अनेक अॅप्स आहेत, पण बहुतेक ऍप्स खोटे असल्यामुळे सावधगिरी बाळगा.

नेटवर्क ॲप वापरणे टाळा

अशा ॲप्स फक्त रॅम साफ करतात किंवा जाहिराती वाढवतात, ज्यामुळे फोन अजून स्लो होतो. त्यामुळे कोणतेही नेटवर्क ॲप वापरणे टाळा.

NEXT: भूकंप आल्यास त्वरित अँड्रॉइड फोनवर अलर्ट कसा मिळवता येईल? वाचा सविस्तर माहिती

येथे क्लिक करा