ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणात आद्रता असल्यामुळे घरामध्ये कुबट दुर्गंध येतो.
तसेच स्वयंपाकघरात स्वच्छता राखली नाही तर तुमच्या स्वयंपाकघरात देखील दुर्गंध येतो.
तुम्ही चारकोलचा वापर स्वयंपाकघरातील दुर्गंध कमी करण्यासाठी केला जातो.
फ्रीझर चारकोलचा वापर केल्यामुळे रेफ्रिजरेटरमधील हानिकारक जीवाणू कमी होतात त्यासोबतच दुर्गंध कमी होण्यास मदत होते.
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्यानंतर डाग आणि त्यामुळे दुर्गंधी निरमाण हेतो त्यामुळे एका वाटीत चारकोल घेऊन मायक्रोवेव्हमध्ये ठेवा यामुळे दुर्गंधी दूर होतो.
किचन सिंक साफ करण्यासाठी पाण्यात चारकोलची पावडर मिसळून पेस्ट सिंकमधये सगळीकडे लावून काही वेळानंतर ब्रशने घासून पाण्याने स्वच्छ धुवा.
अनेकदा किचनमध्येही खूप वेळा पदार्थ खराब झाल्याने दुर्गंध येतो. किचनमधील हवा स्वच्छ आणि ताजेतवाने राहावी म्हणून एका वाटीत चारकोलचे तुकडे ठेवून कुठल्यातरी कोपऱ्यात ठेवा. यामुळे दुर्गंधी येत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.