ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणामध्ये आद्रता निर्माण होणे यामुळे कपडे लवकर सुकत नाहीत.
अनेकवेळा पावसाळ्यात कपाटातून दुर्गंधी आणि कुबट वास येतो.
कपाटातील दुर्गंधी घालवण्यासाठी काही विशेष ट्रिक्स करा फॉलो.
पावसाळ्यात कपामधील कपड्यांमध्ये कपूर टाकून ठेवा यामुळे कपडे प्रेश रहाण्यास मदत होते.
आठवड्यातून दोन वेळा कपाट ओल्या किंवा कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घ्या.
ओल्या कपड्याने स्वच्छ केल्यानंतर कपाटाचे दरवाजे थोड्यावेळ उघडे ठेवा.
कपाटातील ओलावा काढून टाकण्यासाठी त्यामध्ये कडुलिंबाची पाने ठेवा. त्यामुळे कपाटातील दुर्गंधी कमी होईल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.